चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी


मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी अडचणीत वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँकेने चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल, असे जाहीर केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, याआधी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने नोटीस जारी केली आहे. शेअर बाजाराला कोणती माहिती खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या बँकेने दिली. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे न्यूपावरमध्ये आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. दरम्यान, बँकेने म्हटले होते की, सेबीला उत्तरादाखल योग्य ते स्पष्टीकरण दिले जाईल. पण बॅंकेने आता चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याने चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Comment