गुगल प्ले स्टोअरवरुन गायब झाले रामदेव बाबांचे किंभो अॅप


नवी दिल्ली – बुधवारी योगगुरू रामदेव यांच्या पतंजली कंपनीने लाँच केलेले नवे मॅसेजिंग किंभो अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरुन अचानक गायब झाले आहे. पण हे अॅप आयओएस अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. किंभो अॅप्लिकेशन हे मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे. किंभोची टॅगलाईन अब भारत बोलेगा अशी ठेवण्यात आली आहे. किंभो याचा संस्कृत अर्थ आहे एखाद्याची चौकशी किंवा विचारपूस करणे. याचा अर्थ इंग्रजीमधील हॅलो, हाऊ आर यु किंवा व्हॉटसअप यासारखा आहे. केवळ स्वदेशीच्या मुद्द्यावर व्हॉट्सअॅपशी स्पर्धा करणे सोपे नाही. आत्तापर्यंत किंभो केवळ ५ हजार लोकांनी डाऊनलोड केले आहे, अशी माहिती सायबर मीडिया रिसर्चच्या फैसल कवूसा यांनी दिली.

Leave a Comment