फ्रांसबद्दल काही तथ्ये…


फ्रांस देशाचे नाव घेतले की आठवतो, जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेल्या असा भव्य दिव्य आयफेल टॉवर, जगातील अप्रतिम, एकापेक्षा एक सरस कलाकृतींनी सजलेले लूव्र म्युझियम, आणि तत्सम इतर सुंदर प्रेक्षणीय स्थळे. ह्याच सुंदर देशाविषयी आणखी काही माहिती, खास माझा पेपरच्या वाचकांसाठी..

फ्रांस हे जगभरातील पर्यटनस्थळांमधील अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी सुमारे ३८ मिलियन पर्यटक फ्रान्सला भेट देत असतात. फ्रेंच लोकांच्या खानपानाच्या आवडीनिवडी आणि त्यांचे त्यांच्या मातृभाषेवरील प्रेम हे तर जगजाहीर आहे. या शिवाय फ्रेंच नागरिक आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जातात. ती गोष्ट म्हणजे झोप..हो, फ्रेंच नागरिक, जगातील इतर देशांच्या नागरिकांच्या मानाने जास्त काळ झोपतात हे निदान ‘ ओईसीडी स्टॅटिस्टीक्स ‘ द्वारे करण्यात आले आहे. आणि म्हणूनच फ्रांससारख्या देशामध्ये आयुष्य निवांत असते असे म्हटले जाते.

फ्रांस देशातील नागरिकांना सार्वजनिक सुट्ट्या फारशा मिळत अनहित. वर्षाकाठी केवळ अकरा सार्वजनिक सुट्ट्या फ्रान्समध्ये दिल्या जातात. पण नागरिकांना स्वेच्छेने सुट्टी घेण्याची मुभा आहे, व इतर देशांच्या मानाने फ्रांसमध्ये वर्किंग अवर्स कमी आहेत. त्यामुळे फ्रेंच नागरिक सुट्ट्या घेतात, आणि त्यांना काम ही कमी वेळ करावे लागते. पण असे असूनही फ्रांस हा जगातील सर्वात जास्त ‘प्रोडक्टिव्ह’ देशांपैकी एक समाजाला जातो. याचे कारण, फ्रेंच लोक कमी वेळाकरिता कामे करीत असले, तरी कमी वेळात अधिक काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते.

कोणतीही गोष्ट चटकन पटवून न घेणे, किंवा समोर असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही न काही उणीवा शोधणे ही अस्सल फ्रेंच नागरिकांची खासियत आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीचे समाधान ते या लोकांना वाटतच नाही. त्यामुळे फ्रेंच लोक विमनस्क असल्याचे म्हटले जाते. या देशामध्ये सरकारी खात्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. एकूण ४८ टक्के महिला, सरकारी खात्यांमध्ये निरनिराळ्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. तसेच इतर देशातील पुरुषांच्या मानाने फ्रेंच पुरुषांना घरामध्ये काम करणे आवडते. त्यामुळे अगदी घर झाडण्यापासून ते स्वयंपाक, किंवा घरातील इतर लहान मोठी कामे येथील पुरुषमंडळी अगदी आनंदाने करतात.

सुपरमार्केट्स मध्ये मिळणारे तयार अन्नपदार्थ जर विकले गेले नाहीत तर ते टाकून दिले जात असत. अन्नाची अश्याप्रकारे नासाडी होण्यावर बंदी घालणारा फ्रांस हा पहिला देश ठरला. आता सुपर मार्केट्स मध्ये विकले न गेलेले अन्नपदार्थ गरजू लोकांना देणे येथे बंधनकारक आहे. त्याकरिता इथे ‘फूड बॅंक्स’ जागोजागी स्थापन करण्यात आल्या आहेत. येथून गरजू लोकांना मोफत अन्न मिळण्याची व्यवस्था होत असते. त्याचबरोबर या देशामध्ये वर्णभेद ही नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य, समानता इथे हक्क म्हणून मिळाली आहे.

Leave a Comment