महिलांच्या ओटीपोटातील वेदना एन्डोमेट्रीओसीस मुळे तर नाही?


एन्डोमेट्रीओसीस हा आजार महिलांमध्ये मानसिक तणावाला कारणीभूत ठरणारा असतो. गर्भाशयामध्ये वाढणारा टिश्यू जेव्हा गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतो, तेव्हा त्या कंडीशनला वैद्यकीय भाषेमध्ये एन्डोमेट्रीओसीस म्हटले जाते. संपूर्ण जगभरामध्ये, ‘रीप्रोडक्टीव्ह एज ग्रुप’, म्हणजेच प्रजनन करू शकण्याच्या वयोगटातील सुमारे ८९ मिलियन महिलांना या व्याधीने ग्रासलेले आहे. एन्डोमेट्रीओसीस सोसायटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतामधील सुमारे २५ मिलियन महिला या व्याधीने ग्रस्त असून, दर वर्षी या संख्येमध्ये भर पडत आहे.

साधारणपणे दहा महिलांपैकी किमान एकीला तरी ह्या व्याधीने ग्रासलेले आहे. ह्यामुळे पंचवीस ते तीस वयोगटातील, ह्या व्याधीने ग्रस्त असलेल्या महिलांना ओटीपोटामध्ये वेदना होण्यापासून ते मूल न होऊ शकणे इथपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एन्डोमेट्रीओसीसमुळे महिलांना मूल न होणे हे परिस्थिती उद्भवतेच असे नसले, तरी या व्याधीमुळे मासिक धर्माच्या अनेक तक्रारी उद्भवत असल्याने मूल होण्यामध्ये अडचण येण्याची शक्यता जास्त असते.

ह्या व्याधीमध्ये महिलेच्या गर्भाशयामध्ये तयार होणारा टिश्यू गर्भाशय सोडून इतरत्र वाढू होऊ लागतो. हा टिश्यू कधी गर्भाशयाच्या भोवती, तर कधी ओव्हरीजच्या जवळ वाढू लागतो. दर वेळी मासिक धर्म आल्यानंतर या टिश्यूमध्ये ही रक्तस्राव सुरु होतो. परिणामी ओव्हरीजमध्ये सिस्ट निर्माण होण्याचा धोका उद्भवतो. याच कारणामुळे मासिक धर्माच्या काळामध्ये काही महिलांना ओटीपोटामध्ये अतिशय वेदना होत असतात. ह्या वेदना हे एन्डोमेट्रीओसीसचे लक्षण असू शकतात. ओटीपोटाबरोबर पाठदुखी, विशेषतः लोअर बॅक मध्ये वेदना होऊ लागतात. क्वचचित पायही दुखतात. ह्या लक्षणांशिवाय, मासिक धर्माच्या काळामध्ये बद्धकोष्ठ, किंवा डायरिया होणे, रक्तस्राव जास्त होणे, माकडहाडाच्या आसपास वेदना, लघवीवाटे रक्त पडणे, वारंवार लघवीची भावना होणे, मासिक धर्म जास्त काळ सुरु राहणे, क्वचित उलट्या किंवा नॉशिया होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अश्या वेळी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment