हा आहे यावर्षात युट्युबवर सगळ्यात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ


मुंबई : भारतात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप टेन व्हिडिओज् ची यादी सरत्या वर्षाला अलविदा करत असताना यूट्यूबने जाहीर केली असून या यादीत बाहुबली आणि मर्सल हे चित्रपट अव्वल व्हिडिओ ठरले असून दुसऱ्या क्रमांकावर केरळच्या महाविद्यालयात प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या डान्सचा व्हिडिओ आहे.

आतापर्यंत जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या या व्हिडिओला मिळाले आहेत. केरळमधील इंडियन स्कूल ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात ओणमनिमित्त ‘जिमक्की कमल’ या गाण्यावर हा डान्स व्हिडिओ तयार केला. नेटिझन्सची पसंती पारंपारिक साडी नेसून केलेल्या या नृत्याला मिळाली आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहताना ठेका धरल्याशिवाय राहवणार नाही.

या टॉप टेन यादीत इद शरनचा शेप ऑफ यू, आप की अदालतमध्ये क्वीन कंगना राणावतने दिलेली मुलाखत, बीबी की वाईन्स, कॉमेडियन झाकिर खानचा स्टॅण्डअप कॉमेडी अॅक्ट यांचाही समावेश आहे. या यादीमध्ये रांगोळी, मेहंदी यांचे ट्यूटोरियल व्हिडिओजही आहेत. Until We Will Become Dust हा जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला आहे.

Leave a Comment