जिओचे हे चार प्लॅन मिटवणार तुमची डेटाची चिंता


मुंबई : इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचे डेटा प्लॅन काहीसे स्वस्त असले तरी किती डेटा दिवसभर वापरायचा यासाठी मर्यादा आहे. पण आता कंपनीने ही ग्राहकांची चिंता दूर केली आहे. जिओने आता असे चार प्लॅन आणले आहेत, ज्यामुळे दिवसभरात तुम्हाला कितीही डेटा वापरता येईल.

जिओचा पहिला प्लॅन ९९९ रुपयांचा असून तुम्हाला या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी ६० GB डेटा मिळणार आहे. या पॅकमध्ये इतर प्लॅनप्रमाणे दिवसभरात किती डेटा वापरायचा याची मर्यादा नाही. दिवसभरात तुम्ही कितीही डेटा वापरु शकता. शिवाय मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज देण्यात आले आहेत.

जिओचा दुसरा प्लॅन १९९९ रुपयांचा असून तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजसोबत या प्लॅनमध्ये १८० दिवसांसाठी १२५जीबी डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युझर्स आपल्या गरजेप्रमाणे कितीही डेटा वापरु शकतात, त्यासाठी मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

जिओचा तिसरा प्लॅन ४९९९ रुपयांचा असून तुम्हाला या प्लॅनमध्ये ३६० दिवसांसाठी ३५०जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज देण्यात आले आहेत. यामध्येही किती डेटा वापरायचा याची मर्यादा देण्यात आलेली नाही.

जिओचा चौथा प्लॅन ९९९९ रुपयांचा असून तुम्हाला या प्लॅनमध्ये ३६० दिवसांसाठी ७५०जीबी डेटा देण्यात आला आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजही मिळतील. नियमित डेटा वापराची मर्यादा देण्यात आलेली नसल्यामुळे ग्राहक कितीही डेटा वापरु शकतात.

Leave a Comment