१३०० शाखांचे IFSC स्टेट बँकेने बदलले


नवी दिल्ली : आपल्या १३०० शाखांची नावे आणि IFSC कोड देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बदलला असून पाच सहयोगी बॅंकांच्या विलिनिकरणानंतर बॅंकेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

इंडियन फायानॅन्शिअल सिस्टम कोड असा IFSC चा अर्थ होतो. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ११ कॅरेक्टरचा हा अ‍ॅल्फा-न्यूमेरिक कोड जारी केला जातो. बॅंकेच्या प्रत्येक शाखेची ओळख ज्यामुळे पटवली जाते.

IFSC कोड NEFT आणि RTGS सारख्या ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसाठीही गरजेचा असतो. सोप्या पद्धतीने चेक किंवा बॅंककडून जारी करण्यात आलेल्या दुस-या कागदपत्रांतून या कोडची माहिती प्रत्येक बॅंकेचे ग्राहक मिळवू शकतात. स्टेट बँकेचे प्रबंध निर्देशक प्रवीण गुप्ता म्हणाले की, ग्राहकांना IFSC कोडच्या बदलाबाबत माहिती देण्यात आली आहे. पण बॅंकेने आंतरिक रूपाने ग्राहकांना एका नव्या कोडने जोडले आहे.

ते म्हणाले की, काही पेमेंट जर जुन्या IFSC कोडवरून होत असतील तर ते नव्या कोडसह जोडले जातील. कोणत्याही ग्राहकाला याने कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या वेबसाईटवर शाखांचे जुने, नवे नावे आणि IFSC कोडची लिस्ट बॅंकेने जारी केली आहे. त्याचबरोबर ग्राहक स्टेट बँकेच्या ब्रॅंच लोकेटरद्वारे सुद्धा बदलेला IFSC कोड चेक करू शकतात. त्यांना यासाठी ऑनलाईन काही माहिती भरावी लागेल.

Leave a Comment