
मुंबई : एअरटेल पोस्टपेडपाठोपाठ आता आता एअरटेलच्या ब्रॉडबॅन्ड ग्राहकांना त्यांचा उरलेला डाटा पॅक पुढील महिन्यात मिळणार आहे.
डाटा रोलओवरची सुविधा आता एअरटेल ब्रॉडबॅन्डच्या युजर्सना देखील मिळणार
एका सायकलदरम्यान तुमचा काही डाटा राहिल्यास तो पुढील महिन्याच्या बिलिंगमध्ये कॅरी फॉरवर्ड एअरटेल डाटा रोलओव्हरच्या सुविधेमध्ये होणार आहे. सुमारे २१ लाख देशभरात एअरटेल ब्रॉडबॅन्डचे युजर्स आहेत. प्रोजेक्ट नेक्स्टच्या अंतर्गत ही सुविधा एअरटेलकडून लॉन्च करण्यात आली असल्याची माहिती एअरटेलच्या सीईओनी दिली आहे. तुम्ही १००० जीबी पर्यंत डाटा एअरटेलच्या ब्रॉडबॅन्डच्या या सुविधेमुळे साठवू शकता. तर २०० जीबी पर्यंत डाटा पोस्टपेड युजर्स साठवणार आहेत. याबाबतची माहिती माय एअरटेल अॅपवर उपलब्ध करण्यात आली आहे.
