महाराष्ट्रात बिअरवर सरकारने वाढवली एक्साईज ड्युटी


मुंबई : राज्य सरकारने बिअरवर एक्साईज ड्युटी २५ ते ३५ टक्के वाढवल्यामुळे महाराष्ट्रात बिअर महाग होणार आहे.

३ रुपये माईल्ड बिअरच्या पिंटसाठी (३३० मिली), तर साडेचार रुपये स्ट्राँग बिअरसाठी अधिक मोजावे लागणार आहेत. ५ रुपये माईल्ड बिअरच्या पूर्ण बॉटलसाठी (६५० मिली), तर स्ट्राँग बिअरच्या पूर्ण बॉटलसाठी साडेसहा रुपयांची दरवाढ होणार आहे.

माईल्ड बिअरवर २५ टक्क्यांनी, तर स्ट्राँग बिअरवर ३५ टक्क्यांनी राज्य सरकारने जकात कर वाढवला आहे. एक्साईज ड्युटी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर मोजली जाते. विक्रीची किंमत किंवा एमआरपी ही व्हॅट (३५ टक्के) आकारल्यानंतर ठरते. त्यामुळे प्रत्येक ब्रँडची नवीन किंमत येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईजर यासारख्या ब्रँड्सच्या पिंटची किंमत ६० ते १०० रुपयांच्या घरात आहे, तर एका बॉटलसाठी सध्या ११० ते २३० रुपयांच्या दरम्यान रक्कम मोजावी लागते.

Leave a Comment