बाजारात दाखल झाली मर्सिडीजच्या जी६५ एएमजी एसयूव्ही कारची फायनल एडिशन


मुंबई – लोकप्रिय जी६५ एएमजी एसयूव्ही कारची फायनल एडिशन अलीकडेच मर्सिडीज-एएमजीने बाजारात आणली असून जगातील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही म्हणून मर्सिडीज बेंझची जी-सीरीज ओळखली जाते.

सुमारे २.३८ कोटीच्या ( ३१,२३३ ) घरात मर्सिडीज बेंझ जी६५ एडिशनची किंमत असून मर्सिडीज- बेंझ जी-क्लास ही कंपनीची एक श्रृंखला आहे जिचे उत्पादन दीर्घ कालावधीपासून चालू आहे. या मालिकेचे उत्पादन १९७९ मध्ये सुरू झाले. जी६५ फायनल एडिशनमध्ये १२ इंचाची ट्विन स्पोक अॅलॉय चाके देण्यात आली आहेत. जी६५ फायनल एडिशन काळ्या आणि कांस्य रंगामध्ये उपलब्ध असून कार्बन फायबरचा वापर आतील भागात केला गेला आहे. कारच्या स्टेअरिंग आणि फ्लोर मॅटवर ‘फायनल एडिशन’ लिहिलेले आहे. कारमध्ये ६.० लिटर व्ही १२ युनिट इंजिन आहे. हे ६२१ बीएचपी पॉवर आणि १००० एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ७-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनला जोडले गेले आहे. कारचा सर्वोच्च वेग २३० किमी प्रतितास आहे.

Leave a Comment