जिओ देत आहे आणखी एक मोफत सेवा, जी अनेकांना माहितच नाही


नवी दिल्ली : रिलायन्स जिओ सध्या केवळ फ्री कॉलिंग आणि इंटरनेट डेटा देत आहे एवढेच लोकांना माहीत आहे. पण यासोबतच जिओ आणखी एक मोफत सेवा देत आहे, ज्याची अनेकांना माहितच नाही.

मोफत कॉलर ट्यून सेवा जिओ लाँचिंगपासूनच देत आहे. युजर ज्यामध्ये कॉलर ट्यूनमध्ये आवडते गाणे सेट करू शकतो. ही सेवा देण्यासाठी इतर कंपन्या शुल्क आकारतात. जिओच्या अनेक युजर्स अजून देखील हे माहित नाही की विनामूल्य कॉलर ट्यून कसे सेट करावे.

आपल्याला विनामूल्य कॉलर ट्यून सेट करण्यासाठी गुगल प्लेस्टोर किंवा अॅपस्टोरमधून जिओम्युझिक अॅप डाउनलोड करा. गाण्य़ाच्या ऑप्शन पेजच्या उजव्या बाजूस दिसत आहे. तीन डॉट असणाऱ्या ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा. येथे जाऊन जिओ ट्यूनला निवडा. त्यानंतर तुमची कॉलर ट्यून सेट होऊन जाईल. या व्यतिरिक्त, आपण प्लेअर मोडमध्ये कोणत्याही गाण्याला सगळ्यात शेवटी दिसणाऱ्या सेट अॅस जिओट्यून बटणावर क्लिक करुन ट्यून अॅक्टीव्ह करु शकतात.

Leave a Comment