नासाचे ‘कॅसिनी’ यान शनी ग्रहाजवळ नष्ट


वॉशिंग्टन : शुक्रवारी शनी ग्रहाजवळ अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)चे ‘कॅसिनी’ हे अंतराळ संशोधन यान नष्ट झाले असून हे यान भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ५.२५ वाजता शनी ग्रहाजवळ नष्ट झाले.

जवळपास २० वर्ष ‘कॅसिनी’ या यानाने शनी ग्रहाची परिक्रमा करुन, ग्रहावरील हालचालींचे फोटो नासाला पाठवले होते. हे १९९७मध्ये यान अंतराळात पाठवण्यात आले होते. या यानाने २००४मध्ये शनीच्या वलंयाकृती कक्षेत प्रवेश केला. यानंतर या यानाने आपल्या मोहीमेदरम्यान शनी ग्रहाचे ४ लाखपेक्षा जास्त फोटो काढले होते. तर या यानाने एकूण ४.९ अब्ज मैलाचा प्रवास पूर्ण करुन, अंतराळ मोहिमेतील सर्वात मोठी मोहीम फत्ते केली होती.

शनी ग्रहावरील हालचालींचा या यानाने काढलेल्या फोटोंमुळे अभ्यास करण्यात शास्त्रज्ञांना मदत झाली होती. या यानाचा वेग शेवटच्या टप्प्यात ताशी १ लाख २२ हजार किलोमीटर एवढा होता. हे यान यानंतर शनीजवळ गेल्यानंतर नष्ट झाले. नासाला याची माहिती यान नष्ट झाल्यानंतर ८३ मिनिटांनी मिळाली.

Leave a Comment