केंद्र सरकारने तूर, मूग, उडीद डाळींवरील निर्यातबंदी उठवली


नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने तूरडाळ, उडद आणि मुगडाळवरची निर्यातबंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डाळींच्या उत्पादनात गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. देशातील डाळींचे उत्पादन यंदा जवळपास २०० लाख टनांवर पोहोचले असून मागील काही वर्षात उडदाच्या डाळीचे उत्पादन ७ ते १० लाख टन होते ते यंदा १८ ते २० लाख टनांपर्यंत पोहचले आहे. याप्रमाणेच मूग डाळीचे उत्पादनदेखील १५ लाख टनांवरुन २२ ते २४ लाख टनांवर पोहोचले. त्याच पार्श्वभूमिवर डाळींवरची ही निर्यातबंदी उठवण्यात आल्यामुळे आता डाळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bollywood Celebs UGLY FIGHTS with Media | Priyanka Chopra, Parineeti , Salman Khan

Leave a Comment