तीन वर्षांच्या मुलीच्या नवे १०० कोटींची संपत्ती संन्यास घेणार ‘हे’ जोडपे


भोपाळ : आपल्या १०० कोटींच्या संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात राहणाऱ्या एका जोडप्याने घेतला आहे. या जोडप्याला तीन वर्षांची एक मुलगी देखील आहे.

या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ३५ वर्षीय सुमित राठोड आणि त्यांची पत्नी २४ वर्षीय अनामिका २३ सप्टेंबर रोजी गुजरातच्या सुरतमध्ये दीक्षा घेणार आहेत. त्यांना आचार्य रामलाल महाराज दीक्षा देणार आहेत. अनेकांनी अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला मागे ठेऊन दीक्षा घेण्याच्या राठोड दांम्पत्याच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. सुमित आणि अनामिका यांनी व्यापारात आणि व्यवसायात यशस्वी असतानाही संन्यास घेण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पण याचे अनामिकाचे वडील अशोक यांना फार आश्चर्य वाटलेले नाही. मुलगी आणि जावयानं संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या मुलीची जबाबदारी आपण घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपला धार्मिक निर्णय घेण्यासाठी कुणीही स्वतंत्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment