दुपट्टीने वाढला नोटा छपाईचा खर्च


मुंबई : २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केला. पण अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालानुसार नव्या नोटा नोटबंदीनंतर छापण्यात आल्या त्यासाठी ७ हजार ९६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तोच खर्च २०१५-१६मध्ये ३ हजार ४२१ कोटी रुपये एवढा होता.

नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकने दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर नव्या नोटांच्या छपाईसहीत २०१६-१७ मध्ये एकूण नोटांची रक्कम दुप्पट होऊन ७९६५ करोड रुपये झाली आहे. २०१५-१६ मध्ये ही रक्कम ३४२१ करोड रुपये होती. यासोबतच, २०१६-१७ मध्ये ७.६२ लाख तर २०१५-१६ मध्ये ६.३२ लाख नकली नोटांची माहिती मिळाल्याचे बँकेने म्हटले आहे.

Leave a Comment