शाओमीचा स्वस्त आणि मस्त फोन लाँच


मुंबई : चीनची मोबाईल उप्तादक कंपनी शाओमीने रेडमी ४ए या फोनचे नवे व्हेरिएंट नुकतेच लाँच केले आहे. ६ हजार ९९९ रुपये रेडमी ४ए च्या नव्या व्हेरिएंटची किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये ३जीबी रॅम आणि ३२जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे.

आजपासून अमेझॉन आणि MI इंडियाच्या वेबसाईटवर रेडमी ४ए या फोनची विक्री सुरु झाली आहे. रेडमी ४एची लोकप्रियता लक्षात घेत कंपनीने आता या फोनचे नव व्हेरिएंट लाँच करुन बाजारात आणखी स्पर्धा निर्माण केली आहे. रेडमी ४ए मध्ये ५ इंच आकाराची स्क्रीन, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर, ३जीबी रॅम आणि ३२जीबी इंटर्नल स्टोरेज, १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी या फोनची माहिती स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे.

Leave a Comment