
मुंबई : नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या संदर्भात ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेच्या डिझाईनवर सध्या काम सुरू आहे.
पुन्हा एकदा चलनात दाखल होणार १०००ची नवी नोट
म्हैसूर आणि सालबोनीमध्ये या नव्या नोटांची छपाई करण्यात येणार असून त्यासाठी तेथील टाकसाळ सज्ज आहेत. जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा मागील वर्षी २०१६ मध्ये चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा चलनात आल्या. गेल्या सहा महिन्यात २००० हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी २०० रुपयाची नोट चलनात आली. त्याचप्रमाणे नव्या २०० च्या नोटाची छपाई जोरात सुरू आहे.
