अमेरिकेन लेखकाची भविष्यवाणी; २३ सप्टेंबरला नष्ट होणार पृथ्वी


नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर जग संपणार अशी चर्चा सुरु झाली असून जग येत्या २३ सप्टेंबरला संपूष्टात येईल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. एक ग्रह २३ सप्टेंबरला पृथ्वीला धडकणार असल्याचा दावा केला जाट असल्यामुळे पृथ्वीचा अंत होणार असल्याचा दावा केला जात आहे. पण हा दावा वैज्ञानिकांना फेटाळून लावला आहे.

२३ सप्टेंबर २०१७ ला एक्स ग्रह निबेरू पृथ्वीला धडकणार असल्याचा दावा ‘प्लेनेट एक्स-द २०१७ अराइवल’चे लेखक डेविड मीडे यांनी केला आहे. पण यामध्ये वैज्ञानिकांनी कोणतेही सत्य वाटत नाही. डेविड यांचे म्हणणे आहे की, ते आपल्या दाव्यावर पवित्र धर्मग्रंथ बाय़बल वाचल्यानंतर ठाम आहेत. डेविड यासोबत आणखी काही पुस्तकांचा दाखला देखील देत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, एक निर्दयी दिवस जवळ येत आहे. ज्यामध्ये क्रोध आणि भयंकर राग आहे. जो या धरतीचा विनाश करेल.

डेविडच्या मते, धरतीचा विनाश जवळ आला आहे. निबेरू ग्रहावरील एलियन्सनेच मानवाला जन्म दिला होता अशी मान्यता आहे. आफ्रिकेत सोन्याची खाण खोदण्यासाठी एलियंस पहिल्यांदा पृथ्वीवर आले होते. यासाठी त्यांना काही लोकांची गरज होती म्हणून त्यांनी मानवाला जन्म दिला. असे दावे अनेकदा अनेकांकडून होत आले आहेत. पण वैज्ञानिकांनी मात्र त्याला कधीच दुजोरा दिला नाही. मात्र अशा गोष्टी नेहमी चर्चेचा विषय बनतात.

Leave a Comment