तुम्ही पाहिले आहे पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायलेले भारतीय राष्ट्रगीत


लाहोर : एकीकडे कट्टरवैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत असतानाच दोन्ही देशातील शांतता प्रस्थापित करण्याचा अनोखा प्रयत्न दोन्ही देशातील विद्यार्थ्यांनी केला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रगीत भारतीय विद्यार्थ्यांनी सादर करत मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर ‘जन गण मन’ सादर करत पाक ग्रुपने रिटर्न गिफ्ट दिले आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रगीत दोन्ही देशांच्या सीमेवर राहणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ राम’ नावाच्या ग्रुपमधील तरुणांनी सादर केले होते. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १४ ऑगस्ट रोजी ‘व्हॉईस ऑफ राम’ने त्यांचे राष्ट्रगीत ‘पाक सरजमीन’ सादर केले होते. ‘व्हॉईस ऑफ राम’ बँडविरोधात त्यामुळे विविध स्तरातून टीकेची झोड उठली होती.

पण ‘जन-गण-मन’ सादर करुन पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिले आहे. एकत्रित गायलेल्या या राष्ट्रगीतांना ‘शांतिगीत’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment