१४,९९९ रूपयांत कूलपॅड कूल प्ले ६


अवघ्या १४,९९९ रूपये मूल्यात कूलपॅड कूल प्ले ६ हे सहा जीबी रॅम असणारे मॉडेल लाँच करून कूलपॅडने मोबाईल क्षेत्रात धमाल उडवून दिली आहे. हा स्मार्टफोन प्रारंभी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. यानंतर या मॉडेलला दुबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा करण्यात आली. अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले असून याचा पहिला सेल ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

अतिशय गतिमान असा ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ६५३ प्रोसेसर कूलपॅड कुल प्ले ६ या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. या मॉडेलची रॅम सहा जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी एवढे असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. कूलपॅड कूल प्ले ६ मध्ये ड्युअल कॅमेर्‍याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. यात बोके इफेक्टची सुविधा देण्यात आला आहे. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल.

Leave a Comment