
नवी दिल्ली – मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यातच ५० आणि २० रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती. या नव्या नोटा त्यानुसार छापण्याचेही काम सुरू होते, या नोटा आता लवकरच चलनात येणार आहेत.
लवकरच तुमच्या हाती असेल ५० रूपयाची नवी नोट !
याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा रंग मयुर पंखी (साधारण हिरवा) असून ही नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो या नोटांवरही आहे. आरबीआयने काही दिवसांपूर्वीच ५० रूपयांच्या नोटा लवकरच चलनात आणल्या जाणार आहेत अशी घोषणा केली होती. गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नोटांवर असून जरी नव्या नोटा चलनात आल्यातरी ५० रूपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाही हे आरबीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
