व्हायरल झालेल्या लिटिल मास्टर शेफच्या मागील सत्य


सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत असून एका मास्टर शेफने अगदी सराईतपणे पोळ्या बनवल्याचा हा व्हिडिओ असून अगदी ४ ते ५ वर्षाचा हा मुलगा असेल. पण त्याची पोळी म्हणजे चपाती बनवण्याची पद्धत आणि चपातीचा आकार बघून सगळेच अवाक् झाले होते. पण आता या मास्टर शेफची माहिती समोर आली आहे.

फक्त साडे ४ वर्षाचा हा लिटिल मास्टर शेफ असून पुण्यातील नळ स्टॉप कॉलनीतील वाघांच्या घरात हा चिमुरडा शेफ राहतो. अंकित वाघ असे या या लिटिल मास्टरशेफचे नाव आहे. हा मुलगा आपल्या नित्यनियमाच्या कार्यक्रमासोबतच जेवण बनवणे देखील पसंद करतो.

अंकित वाघ हा साडे चार वर्षाचा चिमुकला फक्त पोळ्याच नाही तर अनेक स्वयंपाकघरातील गोष्टी सराईतपणे करतो. तसेच हा चिमुकला पोळीसोबतच अगदी सुंदर करंजी देखील तयार करतो. त्याचप्रमाणे तो स्वतःचे ऑमलेट देखील स्वतः बनवतो. अनेकदा तो आई थकून आल्यावर तिला देखील छानसे खाऊ घालतो.

याबाबत अंकितच्या आई अनुराधा वाघ सांगतात की, लहानपणापासून अंकितला माझ्यासोबत स्वयंपाकघरात ठेवले आहे. मी त्याला यातील एकही गोष्ट शिकवली नाही किंवा करायला लावली नाही. पण तो लहानपणापासून माझ्यासोबत बराचकाळ स्वयंपाकघरात असल्यामुळे तो मनापासून येथे रमतो. अगदी स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी तो मनापासून पाहतो. अगदी कुकरची शिटी किती हवी किंवा मिक्सर कसा चालतो. कणीक कसे मळायचे हे देखील अंकितला माहित आहे.

फक्त चपात्या बनवण्यातच अंकितचा हातखंडा नाही तर हे चिमुकले हात बरच काही करू शकतात. तो करंज्या देखील अगदी मनापासून बनवतो. त्याला थालिपीठ देखील कसे बनवतात हे देखील ठाऊक आहे. त्याचबरोबर अंकितला फिश फ्रायची रेसिपी अगदी उत्तम सांगतो. त्याचे बाबा सांगतात की, त्यांनी हा व्हायरल व्हिडिओ मे महिन्यात युट्यूबवर अपलोड केला. आणि त्यानंतर तो कुणीतरी फेसबुकवर अपलोड केला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अंकित वाघला चार्ली चॅपलिन भयंकर आवडतो. त्यामुळे त्याला एरियात चार्ली बाबा या नावाने हाक मारतात.

Leave a Comment