चेन्नई – तामिळनाडू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सने जीसएसटीला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व थियटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली असताना कोणतीही स्पष्टता होत नसल्यामुळे ३ जुलैपासून थियटर्स बंद राहणार आहेत.
तामिळनाडूतील थियटर्स ‘जीएसटी’मुळे ३ जुलैपासून बंद !
सरकारकडून थियटर्स मालकांनी किती कर भरायचा याची स्पष्टता होत नाही. या आठवड्याच्या अखेरीस राज्य सरकारने हे स्पष्ट करावे. सोमवारपासून संपूर्ण राज्यातील चित्रपटांचे सर्व शो बंद ठेवण्यात येतील, असे तामिळनाडू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अबिरामी रामनाथन यांनी म्हटले आहे. जीएसटी बाबत स्पष्टता होत नसल्यामुळे मल्टीप्लेक्समधील तिकीटांचे बुकींगदेखील सुरू करण्यात आलेले नाही. जीएसटीमध्ये मनोरंजन करदेखील लावण्यात आला तर आम्हाला ५३ टक्के एवढा कर सरकारला भरावा लागेल. आमच्यासाठी हे योग्य नाही. फिल्म इंडस्ट्रीतील १० लाख कुटुंबाना या निर्णयाचा फटका बसू शकतो, असेही ते म्हणाले. १०० रुपयांवरील तिकीटांना २८ टक्के एवढा जीएसटी भरावा लागणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.