रिलायन्स जिओ डीटीएचसाठी नोंदणी सुरू?


रिलायन्स आता जिओनंतर आपली डीटीएच सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून रिलायन्स डीटीएच बॉक्सचा फोटो काही महिन्यांपूर्वी लीक झाल्याने ही सेवा या वर्षांत लाँच होणार असल्याची चर्चा होतीच. त्यातून ‘जनसत्ता डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स जिओच्या डीटीएच सेवेसाठी नोंदणीही सुरू झाली आहे. ही नोंदणी सुरू झाल्याचे generatewish.com ने देखील म्हटले आहे. या बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार डीटीएच सेवा लाँच झाल्यानंतर सुरूवातीचे सहा महिने ती मोफत असणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ४३२ चॅनल पाहता येणार आहेत. त्यातील ५० चॅनेल हे एचडी असणार आहेत. नाव, फोन क्रमांक, राज्य अशी माहिती या सेवेची नोंदणी करण्यासाठी भरणे आवश्यक असणार असल्याचे म्हटले आहे.

कोणत्या तारखेला रिलायन्सने ही सेवा लाँच होणार, याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. पण ‘जिओ केअर नेट’च्या नवीन अपडेटनुसार जुलै महिन्यात ही सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर रिलायन्स जिओ आपली ब्रॉडबँड सेवा ‘जिओ फायबर’ देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा दिवाळीत लाँच करण्यात येईल अशाही चर्चा आहेत. देशातील १०० शहरात ही सेवा दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच करण्यात येणार आहे. रिलायन्सने मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Leave a Comment