या स्मार्टफोनवर ३० जूननंतर बंद होणार व्हॉट्सअॅप


मुंबई : येत्या ३० जूनपासून काही ऑपरेटिंग सिस्टीमवर प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप उपलब्ध नसेल. सध्या आपल्या वापरकर्त्यांना अनेक नवनवीन फिचर्स व्हॉट्सअॅप देत आहे. यातच आता ज्या फोनवर हे फिचर्स चालत नाहीत अशा फोनवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.

मुख्यत्त्वाने गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅपलच्या आयओएसवर व्हॉट्सअॅप वापरले जाते. व्हॉट्सअॅपवर मेसेजिंगसोबतच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलसारख्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. तसेच नुकत्याच जीआयएफ फाईलही व्हॉट्सअॅपवरुन पाठवता येतात. मात्र ३० जूननंतर काही स्मार्टफोनवरुन ही सेवा वापरता येणार नाही.

३० जूननंतर नोकियाच्या सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीमवर आणि ब्लॅकबेरी १० ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीमच्या एस ४० आणि एस ६० सिरीजच्या फोनवर व्हॉट्सअॅप उपलब्ध नसेल. नोकियाच्या जवळपास सर्वच हायएन्ड फोनवर सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आहे. डिसेंबर २०१६ नंतरच या फोन मॉडेल्सवर अॅप चालणार नसल्याचे व्हॉट्सअॅपने जाहीर केले होते. पण त्यानंतर ती मुदत वाढवत आता ३० जूननंतर या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. तसेच डिसेंबर २०१७नंतर अँड्रॉईड २.२ Froyo, विंडोज ७ आणि आयओएस ६ वरही काम करणार नाही.

Leave a Comment