आरबीआय गव्हर्नरपदाच्या शर्यतीत नाही- अरूंधती भट्टाचार्य

arundhati
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबर रोजी संपत आहे व त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा जोरात सुरू असतानाच स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या या संदर्भात मी कधीच कोणतेही विधान केलेले नाही मात्र मिडीयानेच माझ्या नावाची चर्चा सुरू केली आहे. गर्व्हनरपदाच्या शर्यतीत अरूंधती यांचे नांवही चर्चत असल्याच्या बातम्या मिडीयातून सातत्याने येत होत्या त्या संदर्भात त्यांनी ही खुलासा केला आहे.

राजन यांचे उत्तराधिकारी म्हणून रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरसह अनेक नांवे चर्चेत आहेत. प्रथेप्रमाणे पंतप्रधान व अर्थमंत्री यांच्यातील चर्चेनंतर या नावाची घोषणा केली जाईल. आजपर्यंत बहुतेक सर्व गर्व्हनरना दोन टर्म मिळाल्या आहेत. राजन पहिलेच गर्व्हनर आहेत जे दुसरी टर्म घेणार नाहीत. भाजपचे स्वामी यांनी राजन यांच्यावर टीकेची झोड उडविल्यानंतर राजन यांनी दुसरी टर्म नको असल्याचे स्पष्ट केले होते.

Leave a Comment