घरापर्यंत सामान पोहोचविणारे डिलिव्हरी रोबो

robot
येत्या कांही वर्षात डिपार्टमेंटल स्टोअर्स, किराणा अशा गरजेच्या सर्व वस्तू पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून रोबोंचा वापर होऊ लागेल असे संकेत मिळू लागले आहेत. डिलिव्हरी रोबो ही नुसती आता कल्पना राहिली नसून ती हकीकत बनते आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याकडेला सेल्फ ड्रायव्हिंग डिलिव्हरी रोबो दिसल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

स्टारशिप टेक्नॉलॉजी कंपनीने सिलीकॉन व्हॅलीत अशा डिलिव्हरी रोबोंच्या चाचण्या घेतल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत. खाद्यपदार्थांची डिलिव्हरी या रोबोंनी स्वतः ड्राईव्ह करून घरोघरी यशस्वीपणे दिली आहे. रस्तातले अडथळे पार करत पार्सल डिलिव्हरी देण्यात हे रोबो यशस्वी ठरले आहेत. या रोबो वाहनात बसविलेल्या खास सेन्सरमुळे कोणत्याही अन्य वाहनांशी टक्कर न होता, गर्दीतून, सिग्नल व्यवस्थित पाहून व रस्त्यातले अडथळे टाळून या रोबोंनी त्यांचे काम पार पाडले आहे. गेले १ वर्ष या चाचण्या सुरू आहेत असेही समजते.

Leave a Comment