दैत्याची विहीर

vihir
जगभरात कित्येक स्थळे अशी आहेत की या रहस्यमय ठिकाणांचे रहस्य आधुनिक विज्ञानालाही उलगडता आलेले नाही. जगाच्या पाठीवर असा एकही देश नसेल की जेथे अशी रहस्यमय ठिकाणे नाहीत. इंग्लंडच्या न्यजर्बरी भागातही अशी एक रहस्यमय विहीर आहे. या विहीरीत कोणतीही जिवंत वा निर्जिव वस्तू टाकली तरी कांही काळाने त्याचे दगडात रूपांतर होते. स्थानिक लोक या विहीरीला दैत्याची विहीर असेच म्हणतात.

नदी किनार्‍यावर असलेल्या या विहीरीच्या पाण्याची कीर्ती दूरवर पसरली आहे. यामुळे या भागात जाण्यासाठी कोणी लवकर तयार होत नाही कारण या विहीरीच्या पाण्याचा स्पर्श झाला तर आपलाही दगड होईल ही भीती त्यामागे असते. या विहीरीत झाडाची पाने, लाकडे, जिवंत प्राणी असे कांहीही पडले तरी त्याचा दगड बनतो. यामागचे रहस्य संशोधकांनाही उलगडलेले नाही.

आजकाल या जागेला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जात असून साहसी पर्यटक येथे आपले सामान मुद्दाम सोडून जातात व कांही काळानंतर सामानाचा दगड झालेला पाहण्यासाठी पुन्हा भेट देतात. या विहीरीत १८ व्या शतकातली व्हिक्टोरियन हॅट, टेडी बेअर्स, सायकली, किटल्या अशा दगड स्वरूपात मौजूद आहेत. पर्यटक विहीरीत जे पाणी पडते त्याच्याखाली आपल्या वस्तू लटकवून ठेवतात व कांही काळानंतर त्यांचे दगड बनतात. या विहीरीच्या पाण्यातील कांही रसायनांमुळे ही किमया घडत असावी असे संशोधक म्हणतात.

Leave a Comment