भारत-पाक लष्कराचे जवान रिट्रीट सोहळ्यादरम्यान भिडले

broder
पंजाब – दररोज भारत-पाकिस्तान सीमेवर बीटींग रिट्रीट सोहळा पार पडतो. दोन्ही देशांचे हजारो हा सोहळा पाहण्यासाठी लोक येतात. सीमेवर दोन्ही देशांचे झेंडे खाली उतरवताना बीटिंग द रिट्रीट हा सोहळा होतो. मात्र, आता एक व्हिडिओ समोर आला असून ज्यामध्ये या सोहळ्या दरम्यान भारत-पाक लष्कराचे जवान एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बीटींग रिट्रीट सोहळा सुरु असताना भारत आणि पाकिस्तानचे जवान एकमेकांसमोर येतात आणि त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानच्या जवानाची टक्कर झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सोहळ्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दोन्ही जवानांनी हातात आपापल्या देशांचे झेंडे घेतले होते याचवेळी त्यांची टक्कर झाली.

(टीप – हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुणी शूट केला आहे यासंदर्भातील माहिती नसुन याची सत्यताही आम्ही पडताळलेली नाही. हा केवळ एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे)

Leave a Comment