आयडिया देणार मोफत इंटरनेट

idea
मुंबई – दूरसंचार कंपनी आयडियाने ‘सर्वांसाठी इंटरनेट’ या नव्या योजनेची सुरुवात केली असून मोबाईल इंटरनेट वापरणा-या ग्राहकांना या योजनेअंतर्गत १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.

आयडिया कंपनीच्या ‘सर्वांसाठी इंटरनेट’ या नव्या योजनेनुसार, आयडीआयचे प्रीपेड ग्राहक, इंटरनेटचा वापर न करणा-या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्रीमध्ये वापरण्यास मिळणार आहे.आयडियाची ‘सर्वांसाठी इंटरनेट’ ही सेवा मिळविण्यासाठी ग्राहकांनी *७५६# डायल करावे किंवा ५६७५६ या क्रमांकावर IF टाईप करुन एसएमएस पाठवावा. यानंतर मोबाइल इंटरनेट यूजर्सला ही सेवा मिळविता येईल.

इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. हा वापर आणखीन वाढविण्यासाठी आम्ही ही योजना राबवत आहोत. या योजनेमार्फत मोबाइल इंटरनेट न वापरणा-यांना ही सेवा उपलब्ध करुन देत आहोत असे आयडिया सेल्यूसरच मुख्य अधिकारी शशिशंकर यांनी सांगितले.

Leave a Comment