आता कधीही काढू शकता पॉलिसीचे पैसे!

policy
मुंबई : आता लवकरच विमा ग्राहकांना गरज असेल तेव्हा रक्कम काढण्याची अनुमती मिळणार असून यावर कोणताही दंड देखील आकारला जाणार नाही. लवकरच इरडा वीमा कंपनीचे हे नियम लागू करणार आहे.

याबाबतची माहिती इरडाच्या एका अधिकाऱ्याने दिली असून, त्यांच्या माहितीनुसार १० ते १५ टक्के रक्कम सोडून बाकीची रक्कम विमा ग्राहकांना काढता येणार असल्यामुळे पॉलिसी देखील सुरू राहील आणि गरजेच्या वेळी पैसे काढल्यावर कोणताही दंड देखील आकारला जाणार नाही. ग्राहकांना विमा कंपनी पॉलिसी काढण्याआधी हा पर्याय देईल. पण जर ग्राहकांनी हा पर्याय सुरुवातील निवडला तरच मध्ये कधीही पैसे काढल्यास दंड़ आकारला जाणार नाही.

Leave a Comment