बिल गेट्स जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती

bill-gates
न्यूयॉर्क- पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्तिचा बहुमान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक व अब्जाधीश बिल गेट्स यांनी प्राप्त केला असून गेट्‍स यांची एकूण मालमत्ता ‘वेल्थ-एक्स’ने जाहीर केलेल्या नव्या लिस्टमध्ये ८७.४ बिलियन डॉलर (जवळपास ५.९ लाख कोटी) सांगितली आहे. विशेष म्हणजे वेल्थ एक्सच्या टॉप-५० यादीत तीन भारतीयांचा समावेश करण्‍यात आले आहे.

भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ति म्हणून यादीत रिलायन्य उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांना २७वे स्थान देण्यात आले आहे. अंबानींशिवाय अजीम प्रेमजी व दिलीप संघवी या भारतीय उद्योजकांनाही टॉप-५० मध्ये स्थान देण्यात आले आहे.

Leave a Comment