नवा पॉलीमर करणारा काही सेकंदात पाणी शुद्ध

ploymor
न्यूयॉर्क : काही सेकंदांत पाणी शुद्ध करू शकणारे नवे पॉलीमर शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे अनेकदा पुनर्वापरही या पॉलीमरचा करता येतो.

ज्याप्रमाणे घरातील एअर फ्रेशनर हवेतील दूषित घटक शोषून हवा ताजी करतो अगदी त्याचप्रमाणे हे पॉलीमर वाहत्या पाण्यातील घाण शोषून पाणी स्वच्छ करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही एअर फ्रेरशनरमध्ये वापरण्यात येणाराच सायक्लोडेक्सटि्न हा पदार्थ वापरण्यात आला आहे.

सायक्लोडेक्सटि्नचा सछिद्र अवतार अमेरिकेच्या कोर्नेल विद्यापीठाचे सहयोगी प्रोफेसर विल डिचेल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तयार केला आहे. सायक्लोडेक्सटि्नच्या या अवतारात पारंपरिकरीत्या वापरण्यात येणा-या सक्रिय कार्बनच्या तुलनेत प्रदूषकांना शोषून घेण्याची क्षमता काही बाबतीत २०० पटींहून अधिक दिसून आली. सायक्लोडेक्सटि्नच्या जुन्या पॉलीमरच्या तुलनेत सक्रिय कार्बनचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ तर जास्त असते; परंतु जेवढ्या शक्तीने सायक्लोडेक्सटि्न प्रदूषकांना बांधून ठेवू शकतो, तेवढी शक्ती सक्रिय कार्बन दाखवू शकत नाहीत.

डिचेल म्हणाले की, हे पदार्थ वाहत्या पाण्यातून काही सेकंदांतच प्रदूषणकारी घटक नष्ट करतील. सायक्लोडेक्सटि्न युक्त पॉलीमरचे फेरउत्पादन सहज आणि किफायतशीररीत्या केले जाऊ शकते. या पॉलीमरचा कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा वापर करता येऊ शकतो आणि तरीही त्याच्या कामगिरीत थोडीही घट होत नाही. नव्या पॉलीमरबाबतचे हे निष्कर्ष नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Leave a Comment