फ्लिपकार्टवर आता कार व बाईक खरेदीही शक्य

flipcart
ऑनलाईन मार्केटप्लेस फ्लिपकार्टने बंगलोर येथील त्यांच्या मुख्यालयात कार व मोटरबाईक्सची ऑनलाईन विक्री करण्याचा प्रयोग स्थानिक पातळीवर सुरू केला आहे. त्यासाठी खिवराज मोटर्स यांच्याबरोबर बजाज मोटरसायकलसाठी तर कल्याणी मोटर्स यांच्याबरोबर मारूती सुझुकी कार्स विक्रीसाठी करारही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांना या डिलर्सकडून वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहनही देत आहे.

फ्लिपकार्टची ही योजना स्पर्धक कंपनी स्नॅपडीलशी स्पर्धा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असल्याचे समजते. स्नॅपडीलने गेल्याच महिन्यात स्नॅपडील मोटर्स प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्यात वाहनांचे ऑनलाईन बुकींग आणि कर्जप्रक्रिया दोन मिनिटांत पुरी केली जात आहे. स्नॅपडीलने हिरो मोटर्सच्या बाईक्स व पियाज्याचे मिनीट्रक तसेच मारूती, महिद्र व डस्टन ही वाहने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.

फ्लिपकार्टचे उपाध्यक्ष अनिल गोटेटी यांच्या म्हणण्यानुसार फ्लिपकार्टवर ऑटोमोबिलचे सुटे भाग टॉप टेन सेल कॅटेगरीत यापूर्वीच आले आहेत. त्यापाठोपाठ वाहन विक्री ओघाने आलीच. सध्या ही सेवा बंगलोर येथे दिली जात असली तरी ती लवकरच चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, व मुंबईतही सुरू केली जात आहे.

Leave a Comment