आता ट्विटरद्वारे भरा बिल

twitter
न्यूयॉर्क : ट्विटरचे युझर्स आता लवकरच त्यांचे बिल ट्विटरद्वारे भरू शकणार आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भारतीय कंपनी लूकअपशी ट्विटर करार करणार आहे. लूकअपलाईट वर युझर्सना थेट संदेश पाठवायचा असल्यामुळे यूझर्स नियोजित भेट घेण्यासाठी तारखा निश्चित करू शकतील. पुरवण्यात येणा-या सेवेची चौकशी करू शकतील आणि व्यवसायाशी निगडित व्यवहार पण करू शकतील, अशी माहिती टेकक्रन्चने दिली.

विक्रेते आणि ग्राहकांना लूकअपद्वारे एकमेकांशी थेट संवाद साधता येईल. आतापर्यंत १.२ दशलक्ष युझर्सनी नोंदणी केली असून यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूच्या व्यापारांचा पण समावेश आहे. सध्या युझर्स, ट्विटरच्या बॉय बटनचा उपयोग करून सोशल नेटवर्कद्वारे थेट खरेदी करू शकतात. आदेश आणि देयके ट्विटरद्वारे स्वतंत्रपणे आणि ऑफलाईन हाताळल्या जातील. ज्यामुळे व्यवहार अधिक सुलभ होतील.

Leave a Comment