नासाला इसिसची रागपट्टी; म्हणे प्लुटोला द्या ‘मून ऑफ मोहम्मद’ नाव

nasa
बगदाद – प्लुटो मोहीम नासाने यशस्वी केल्यानंतर सुर्य मालिकेतील नववा ग्रह हा मोहम्मदचा चंद्र असल्यामुळे या ग्रहाचे नाव ‘मून ऑफ मोहम्मद’ ठेवा, असा दम इसिस या दहशतवादी संघटनेने नासाला दिला आहे.

इसिसच्या दहशतवादी गटाने संकेतस्थळावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या गटाने प्लुटोला ‘मून ऑफ मोहम्मद’ असे नाव द्यावे असा नासाला दम भरला आहे. प्लुटोच्या पृष्टभागावर अरबी भाषेसारखा मजकूर आढळला आहे, नासाने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रावर हे स्पष्ट दिसत असल्याचा दावा इसिसने केला आहे. याला सुमारे ५ हजार लोकांनी समर्थन दिले असून, यांनीही ‘मून ऑफ मोहम्मद’, असे नाव द्यावे, अशी मागणी केली. प्लुटोचे अधिक छायाचित्रे प्रकाशित करण्याची मागणीही इसिसने नासाकडे केली आहे.

Leave a Comment