महाराष्ट्रात फॉक्सकॉन करणार हजारो कोटींची गुंतवणूक

cm1
मुंबई : आता आपल्या महाराष्ट्रात स्टेटस सिंबल असलेल्या अॅपलच्या आयफोनची निर्मिती होणार असून ब्लॅकबेरी, अॅपल, एक्सबॉक्स, किंडल यासारख्या मातब्बर कंपन्यांसाठी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीशी राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे.

ही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवणारी फॉक्सकॉन जगातील सर्वात मोठी कंपनी असून पुण्याजवळ तळेगावात फॉक्सकॉन कंपनी आपले युनिट उभारणार आहे. या करारामुळे भविष्यात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्रात आयफोनच्या किमतीही मोठ्या प्रमाणात उतरणार आहेत. या प्रकल्पासाठी कंपनी तब्बल ३५,००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याने येत्या काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तैवानस्थित फॉक्सकॉनचा एक प्रकल्प याअगोदरपासूनच भारतात कार्यरत आहे. मात्र, कंपनीचे बहुतेक उत्पादन हे चीनमध्येच असते. परंतु, गेल्या काही काळात चीनची अर्थ व निर्मितीस्थिती लक्षात घेता कंपनी आपल्या प्रकल्पासाठी अन्य ठिकाणांच्या शोधात होती. आयफोनबरोबर स्पर्धा असलेल्या कोरियन कंपनी सॅमसंगचा सध्या उत्तर भारतात मोबाईल उत्पादन प्रकल्प आहे.

सांमजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गौ यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

Leave a Comment