८० किलो सोने तिरूपतीला मिळते व्याजाच्या रूपात

tirupati
हैद्राबाद – ‘तिरूमला तिरूपती देवस्थानम’ च्या बँक खात्यांमध्ये तब्बल ४ हजार ५०० किलो सोने जमा असल्याची माहिती समोर आली असून त्यावर देवस्थानाला व्याज म्हणून दरवर्षी ८० किलो सोने मिळत असल्याचे समोर आले आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणखी एक टन सोने देवस्थान प्रशासन जमा करणार असल्याची माहिती दिली आहे. बाजारभावाप्रमाणे ५५०० किलो सोन्याचे मूल्य सुमारे १,३२० कोटी रूपयांच्या घरात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मनाभस्वामी मंदिरातील सर्व दागदागिणे व मुर्तीची किंमत साधारणपणे १ लाख कोटीच्या आसपास असल्यामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तिरूपती देवस्थानच्या एकूण संपत्तीची माहिती आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आलेली नाही. तिरूमला मंदिराची संपत्तीमध्ये आजच्या तारखेला तब्बल ४.५ टन सोने आहे. त्यावर व्याज म्हणून त्यांना दरवर्षी ८० किलो सोने मिळते. त्यात भर म्हणून देवस्थान लवकरच स्टेट बँकेत १ टन सोने जमा करणार आहे. अशी माहिती देवस्थान प्रशासनाचे कार्यकारी अधिकारी डी सम्बसिवा राव यांनी दिल्यामुळे या सर्व संपत्तीची किंमत १ कोटीच्याही वर आहे.

Leave a Comment