फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ठाणे खाडी घोषित

flemingo
मुंबई – महाराष्ट्र सरकारने फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ठाणे खाडी आणि आसपासच्या १७ कि.मी. परिसराला घोषित केले आहे. ठाणे खाडी परिसराला महसूल आणि वन खात्याने अधिसूचना काढून फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले.

ही माहिती मुख्य वनसंरक्षक वासुदेवन यांनी दिली असून ठाणे खाडीच्या १७ कि.मी.च्या पट्ट्यात २५ हजाराहून अधिक फ्लेमिंगो येऊन जातात यापुढे हा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ओळखला जाईल असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

वनखात्याच्या अखत्यारीत हा भाग येत नसल्यामुळे सध्या येथे येणा-या फ्लेमिंगोना कोणतेही संरक्षण मिळत नाही. अनेकदा मच्छीमार येथे खेकडे पकडण्यासाठी येतात. त्यामुळे पक्ष्यांना त्रास होतो. फ्लेमिंगोचे मटण खाण्यासाठी म्हणूनही फ्लेमिंगोची शिकार झाल्याची अनेक उदहारणे आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये तिवरांचे जंगल असल्याने अनेक स्थालांतरीत पक्षी येथे येतात. फ्लेमिंगो शिवाय २०५ जातीचे पक्षी ठाणे खाडी परिसरात येतात.

Leave a Comment