मुंडेंचा कच्चा गृहपाठ

munde
महाराष्ट्रात चिक्की प्रकरण गाजवून फडवणीस सरकारची नाचक्की करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबल कसली आहे पण त्यासाठी करावा लागणारा त्यांचा गृहपाठ एवढा कच्चा आहे की त्यांची कींव यावी. गेल्या काही दिवसांपासूून २०६ कोटी रुपयांचे चिक्की प्रकरण असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी घणाघाती भाषण करण्याचा आव आणून चिक्की प्रकरणाचा पंचनामा करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या या बंधूरायाच्या प्रत्येक आरोपातली हवा काढून घेतली. धनंजय हे अर्जुनाचे नाव. अर्जुनाचा बाण कधी वाया जात नसे कारण तो निष्णात धनुर्धर होता पण या धनंजयाच्या आरोपाचा प्रत्येक बाण वाया असल्याचे पंकजा मुंडे यांच्या उत्तराने सिद्ध झाले. ु

मुळात २०६ कोटी रुपयांची चिक्की खरेदी केेलेलीच नाही. २०६ कोटी रुपयांची रक्कम अंगणवाडीतल्या मुलांच्या आहारावर खर्च झाली आहे पण त्यातले १६० कोटी रुपये प्रत्येक अंगणवाडी सेविकेच्या खात्यात जमा झाले आहेत आणि ते पैसे त्यांनी मुलांना केळी आणि अंडी देण्यासाठी रीतसर खर्च केले आहेत. ही माहिती पंकजा मुंडे यांनी सांगितली. तिचा प्रतिवाद कोणी केला नाही. कारण ही माहिती खरी आहे. याचा अर्थ सरकारला बदनाम करण्यासाठी जो २०६ कोटी रुपयांचा आकडा सांगितला जात आहे तोच मुळात चुकीचा आहे . मात्र सरकारवर आरोप करण्यासाठी हा आरोप करताना आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना खरेदी नेमकी किती रुपयांची झाली आहे याची प्राथमिकही माहिती धनंजय मुंडे यांनी घेतलेली नाही.

धनंजय मुंडे यांनी मोठ्या आवेशात एकेक कागद सभापतींच्या समोर ठेवला आणि तो ठेवताना, हा घ्या पुरावा, असे जोशात म्हटले पण हे पुरावे किती बोगस होते आणि अपुरे होते हे नंतर लक्षात आले. उदाहरणार्थ. आयुर्वेदिक बिस्किटे पुरवणार्‍या कारखान्याला बिस्किटे तयार करण्याचा परवानाच नाही असे म्हणून त्यांनी या कारखान्याचा परवाना वाचून दाखवला. तो परवाना दुधावर प्रक्रिया करण्याविषयीचा होता. पण त्या परवान्यात बिस्किटांचा उल्लेख नाही याचा अर्थ त्याला तसा परवानाच नाही असा होत नाही. बिस्किटे तयार करण्याचा परवाना दुसरा आहे आणि तो धनंजय मुंडे यांनी लपवून ठेवला. पंकजा मुंडे यांना तो नंतर सदनाला दाखवला तेव्हा धनंजय मुंडे यांचे आरोप कसे पोरकटपणाचे होते हे सर्वांना लक्षात आले. या गोष्टी काही वृत्त वाहिन्यांनी थेट प्रक्षेपण करून दाखवल्याने तर धनंजय मुंडे चांगलेच उघडे पडले.

Leave a Comment