पाकिस्तान, चीनमधून कांदा आयात

onions
दिल्ली – दिल्लीत दिवसनेदिवस होत असलेल्या कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी नाफेडने पाकिस्तानसह जगभरातील देशांकडून कांदा आयातीसाठी निविदा मागविल्या आहेत. १० हजार मेट्रीक टन कांद्यासाठी या निविदा मागविल्या गेल्या असल्याचे समजते. नाफेडचे संचालक डॉ.बिजेंद्र यांनी ही माहिती दिली आहे.

डॉ.बिजेंद्र म्हणाले निविदांची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. पाकिस्तान आणि चीनमधून कांदा आयात करणे तुलनेते सोपे असल्याने या देशातूनच कांदा आयात करण्याला प्राधान्य दिले जाईल. दिल्लीत सध्या ४२ रूपये किलो दराने कांदा विकला जात आहे. आयात कांदा बाजारात आल्यानंतर दर नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. दरम्यान नाफेड आणि आयएसएफसी ला कांदा साठवणीसाठी केंद्राने ५-५ कोटी रूपये दिले होते. त्यानुसार नाशिक येथे कांदा साठविला गेला असून तो २५०० टन आहे. हा कांदा दिल्लीला पाठविला जात आहे.

कांदा दरवाढीमुळे केंद्रात सरकार कोसळण्याची नौबत आली होती आणि त्यामुळेच यंदा सरकारने कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा साठवण करण्याचा निर्णय घेतला होता असे समजते.

Leave a Comment