नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या दारात आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली मोठी घट लक्षात घेता सरकारी तेल कंपन्यानी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पेट्रोलच्या दरात सलग तिस-यांदा आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्यांदा कपात करण्याची दाट शक्यता आहे.
आज स्वस्त होऊ शकते पेट्रोल, डिझेल ?
सरकारी तेल कंपन्यांनी मूल्यवर्धित कर (व्हॅट) वगळता पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या १५ जुलै रोजी दोन रुपयांची कपात केली होती. गेल्यावेळी आढावा घेतल्यानंतर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सरासरी पाच टक्क्यांनी कमी झाले आहेत. याच कालावधीत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ०.४६ टक्क्यांनी कमजोर झाला. याच दोन गोष्टींच्या आधारावरच सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याची १५ तारीख आणि महिनाअखेरीस पेट्रोल, डिझेलच्या दराचा आढावा घेत असतात.
सध्या सर्व कर आणि शुल्क वगळून तेल शुद्धीकरण कारखान्यात पेट्रोललचे दर ३१.१५ रुपये लीटर आणि डिझेल २८.२४ रुपये लीटर आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पेट्रोल, डिझेलच्या दरात दीड रुपयाची कपात होण्याची दाट शक्यता आहे.
