केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून योगाचे वर्ग

yoga
नवी दिल्ली : आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून भारत सरकार योगाचे वर्ग सुरू करणार असून याबाबत पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार २० मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल पासून योग क्लासेस सुरू होणार आहेत. एका अंदाजानुसार केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्यावर आधारीत लोकांची संख्या जवळ-पास ३० लाखांपर्यंत आहे.

भाजपची योग या विषयाला प्रोत्साहन देण्यामागे भूमिका असल्याचे म्हटले जात असून मागील वर्षी संयुक्त राष्ट्रच्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगचे महत्व सांगितले होते. यानंतर संयुक्त राष्ट्रने घोषणा केली होती की, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment