‘गटर ऑईल’ चा इंधन म्हणून वापर

gutter-oil
शांघाय : हॉटेलमध्ये अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या खाद्य तेलाचा इंधन म्हणून वापर करून चीनच्या हायनन एअरलाइन्स कंपनीने एक प्रवासी विमान उडविले. चाचणी करण्यासाठी कंपनीने बोईंग ७३७ प्रकारचे प्रवासी विमान वापरले होते. विमानात खाद्य तेल आणि परंपरागत जेट इंधन यांच्या ५०-५० टक्के मिश्रणातून तयार केलेले इंधन वापरण्यात आले आणि विमान कोणत्याही अडथळ्याविना व्यवस्थित प्रवास करून शांघायहून बीजिंगला पोहोचले. हायनन एअरलाइन्सने प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली. विमानात इंधन म्हणून जे खाद्य तेल वापरण्यात आले त्याला चीनमध्ये ‘गटर ऑईल’ असे म्हणतात.

आजवर हॉटेलमध्ये वापरून झालेले खाद्य तेल अर्थात ‘गटर ऑईल’ गरीबांसाठी स्वस्तातले खाद्यपदार्थ तयार करणारे व्यावसायिक पुन्हा वापरत होते. या ‘गटर ऑईल’ च्या सेवनाने प्रकृतीला हानी पोहोचते, असे चीनच्या डॉक्टरांचे म्हणणे होते पण विमानात इंधन म्हणून वापरण्यात आल्यामुळे ‘गटर ऑईल’ चे महत्त्व एकदम वाढले आहे.चाचणी यशस्वी झाल्यामुळे ‘गटर ऑईल’ चा विमानांसाठी जास्तीत जास्त उपयोग करण्यासंदर्भात लवकरच धोरण तयार करण्याबाबत चीन सरकार विचार करीत आहे.

Leave a Comment