आता शिर्डीच्या साईमंदिरातही पेड दर्शन

saibaba
नगर : शिर्डीच्या साईबाबांचे आता सर्वसामान्य साईभक्तांनाही व्हीआयपी दर्शन घेता येणार असून व्हीआयपी दर्शनासाठी शिफारशीची गरज येत्या १ एप्रिलपासून संपणार आहे आणि तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर शिर्डीच्या साईमंदिरातही पेड दर्शन सुरु होणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

साईबाबांचे लवकरात लवकर आणि व्हीआयपींसारखे दर्शन सामान्य साईभक्तांना घेता यावे, या उद्देशाने साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे आता कोणीही सामान्य भक्त पैसे भरुन व्हीआयपींच्या रांगेतून साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी १०० रुपये, काकड आरतीसाठी ५०० रुपये आणि इतर आरत्यांसाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये भरुन व्हीआयपींसारखे दर्शन घेणे शक्य होणार आहे. याआधी ही व्यवस्था केवळ व्हीआयपी व्यक्तींसाठीच होती.

Leave a Comment