
मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्मार्ट कार्डची योजना सुरु केली होती आणि ते कार्ड रिचार्ज करण्यासाठी मुंबईकरांना तासनतास रांगा लावाव्या लागत होत्या पण आता या त्रासातून त्यांची मुक्तता होणार आहे. कारण यापुढे ऑनलाईन पद्धतीने मुंबईकर घरबसल्या स्मार्टकार्ड रिचार्ज करु शकणार आहेत.
मेट्रोचे स्मार्टकार्ड करा घरबसल्या रिचार्ज !
ही स्मार्टकार्ड रिचार्जची सेवा पन्नासहून अधिक बँकांनी उपलब्ध करुन दिली असून यापुढे तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून स्मार्टकार्ड रिचार्ज करु शकता. विशेष म्हणजे त्यासाठी कुठलाही जास्तीचा चार्ज आकारला जाणार नसल्यामुळे यापुढे तुम्हाला मेट्रोचे स्मार्टकार्ड रिचार्ज करायचे असेल तर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तसेच उद्यापासून लोकलच तिकीटही तुम्हाला मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यासाठी रेल्वेने आर वॉलेट अॅप्लिकेशन तयार केले असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या सेवेची उद्यापासून सुरुवात होणार आहे.
