राम मंदिरासाठी करोडोच्या संख्येने एकत्र या – तोगडिया

pravin-togdia
वर्धा : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी वर्ध्यात आयोजित विशाल हिंदू संमेलनातराम मंदिर बांधण्यासाठी करोडोच्या संख्येने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. गो हत्या बंदी थांबविल्या पाहिजे, हिंदूंचे धर्मांतर थांबले पाहिजे. पण हे सर्व तेव्हाच थांबेल जेव्हा भव्य राम मंदिर होईल आणि हिंदुना पुन्हा सन्मान प्राप्त होईल असेही तोगडिया यावेळी म्हणाले. त्यामुळे एका बाजुला मोदी सरकार विरोधकांच्या टीकांचा सामना करत असताना, विश्व हिंदू परिषद आणि काही हिंदूत्ववादी संघटनांच्या वक्तव्यांमुळे ते आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment