`इसिस’च्या रडारवर आता मुंबईतील गुजराती बांधव

isis
मुंबई – इराकचा नायनाट करणा-या `इसिस’ या धर्मांध मुस्लिम दहशतवादी संघटनेची वक्रदृष्टी आता मुंबईच्या दिशेने वळविली असून मुंबईतील प्रमुख शाळांवर तसेच येथील गुजराती भाषिकांवर पेशावरप्रमाणेच हल्ले करण्याचा भीषण कट `इसिस’च्या दहशतवाद्यांनी आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून मुंबई पोलीसही या धमकीनंतर सतर्क झाले असून मुंबईतील गुजरातीबहुल भागांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

`इसिस’मध्ये सामील झालेल्या कल्याणच्या चार मुसलमान तरुणांपैकी फहद शेख याने तसे ट्वीट केल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. २६/११ रोजी विशिष्ट ठिकाणी हल्ले करण्याचे कारण गुजराती लोकांना मारणे हेच होते. गुजरातमधील मुसलमानविरोधातील दंगलींसाठी मुंबईतील गुजरात्यांनी पैसा पुरवला होता. त्यांच्यामुळेच गुजरातमध्ये अनेक निरपराध मुस्लिम मारले गेले’, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

कल्याण येथील चार तरूण इसिसच्या संपर्कात आले. त्यातील आरिब मजीद भारतात परतला असला तरी अन्य तिघे इसिससाठी सिरीयात अतिरेकी कारवाया करत असल्याची माहिती आहे. त्यांच्यातीलच फहद शेख याने मुंबईतील संभाव्य हल्ल्याबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्याचा गुजरातीद्वेष अक्षरशः उफाळून आल्याचे निरीक्षण आयबीने नोंदवले आहे.

Leave a Comment