अतिबर्फवृष्टीमुळे मनालीतील हॉटेल व्यासायिकांची पंचाईत

manali
शिमला – यंदा अति बर्फवृष्टीमुळे मनालीला ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जाणा-या पर्यटकांनी नापसंती दर्शविली असून यंदाच्या अति बर्फवृष्टीमुळे पर्यटकांनी मनालीऐवजी गोवा, केरळ आणि राजस्थानकडे मोर्चा वळविल्याने स्थानिक हॉटेल व्यासायिकांची पंचाईत झाली आहे.

थंडीची लाट सध्या उत्तरेकडे असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे आगाऊ नोंदणी केलेल्या पर्यटकांनी देखील हॉटेलची बुकिंग रद्द केल्याने यंदा मनालीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मनालीत होणार्या बर्फवृष्टीमुळे दरवर्षी या हंगामात येथील हॉटेलमध्ये गर्दी होत असते. त्यामुळे हॉटेल चालकांचा व्यवसाय देखील तेजीत असतो. पर्यटकांची संख्या वाढली की हॉटेलचे दर देखील वाढविले जातात. परंतु, यंदा मात्र हे चित्र पूर्णतः पालटले आहे. मनालीत सुमारे दीड हजार हॉटेल आहेत. तर कुलू जिल्ह्यात हॉटेलांची संख्या सुमारे २५०० इतकी आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मनालीत ८० टक्के पर्यटकांनी हॉटेल बुकिंग केले होते. यंदा मात्र हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे आता हरियाणा आणि पंजाब येथून बुकिंग न करता येणा-या पर्यटकांकडून स्थानिक हॉटेल चालकांना अपेक्षा आहे.

Leave a Comment