उपांत्य फेरीत सायना, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

sania
दुबई – जागतिक सुपर सिरिज फायनल बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह किदांबी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

शनिवारी चीनच्या चेन लाँगविरुद्ध पुरुष एकेरीतील उपांत्य फेरीत श्रीकांतची डाळ शिजली नाही. त्याने १८-२१, ९-२१ असा सहज पराभव स्वीकारला.

तत्पूर्वी, तैवानच्या टाइ झु यिंगकडून सायनाला महिला एकेरीत २१-११, १३-२१, ९-२१ असा पराभवाचा बसला. गटवार साखळीतील तिन्ही लढती जिंकल्याने सायनाची अंतिम फेरी नक्की मानली जात होती.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या टाइविरुद्ध पहिला गेम सहज जिंकत तिने तशी सुरुवातही केली. मात्र दुसरा गेम जिंकत यिंगने सुरेख ‘कमबॅक’ केले. तिस-या आणि अंतिम गेममध्ये मात्र सायनाच्या चुकांचा फायदा उठवत तिने वर्चस्व राखले. २०११ मध्ये या स्पर्धेत सायनाने अंतिम फेरी गाठली होती. त्याची पुनरावृत्ती करण्यात तिला अपयश आले.

Leave a Comment